पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एआय परिषदेत संबोधित करताना विविध विषयावर भाष्य केले. भारत AI ची स्वीकार करण्याबरोबरच डेटा गोपनीयतेचा तांत्रिक-कायदेशीर आधार तयार करण्यात आघाडीवर आहे.
AI मुळे अनेक रोजगारांच्या संधी निर्माण होत आहे. AI मानवतेचा कोड लिहित आहे. AI मुळे लाखो लोकांचे आयुष्य बदलत आहे. काळानुसार रोजगाराचं स्वरुप बदलत आहे.
आपल्याला AI मुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संकटावर लक्ष द्यावं लागेल. कोणतंही तंत्रज्ञान नोकऱ्या घेत नाही, हेच इतिहास आपल्याला सांगतो, असेही मोदी म्हणाले.आपल्याला ओपन सोर्स सिस्टम विकसित करावी लागेल. ज्यामधून विश्वास आणि पारदर्शकता वाढेल.
आम्हाला निष्पक्ष गुणवत्तापूर्ण डेटा सेंटर बनवले पाहिजे. आम्हाला तंत्रज्ञानाचे लोकतंत्रीकरण करणे आवश्यक आहे. आपल्याला सायबर सुरक्षा, चुकीची माहिती तसंच डीपफेकच्या संबंधीत काळजी दूर केल्या पाहिजेत. तंत्रज्ञान स्थानिक प्रज्ञेमध्ये रुजले पाहिजे. त्यामुळे ते प्रभावी आणि उपयुक्त ठरेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.