नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर टुडेने स्वतंत्र पत्रकार, संशोधक आणि लेखक जयदीप हर्डीकर यांच्याशी संवाद साधला. नागपूर शहरातील ज्वलंत मुद्दयांवर भाष्य करत हर्डीकर यांनी आपले मत मांडले.
नागपूर शहर आर्थिकदृष्ट्या अद्यापही असक्षम –
राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही.मागील २० वर्षापासून सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलो तरी याठिकाणाहून मला कधीच आर्थिक फायदा झालेला नाही. जे काही कमविले ते बाहेरच्याच कामातून मला मिळाले आहे.शहरातील उच्च शिक्षित तरुणाच्या हाताला रोजगार नाही. आपले शहर सोडून ते इतर शहरात जातात.कारण शहरात सुरक्षित, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या फार कमी आहेत.त्यामुळे नागपूर शहर आर्थिकदृष्ट्या स्थिर नसल्याचे चित्र आहे.
शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज –
नागपुरात शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे.याठिकाणी शिक्षण संस्था तर खूप आहेत. पण याठिकाणी शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. हे विद्यार्थ्यांसाठी घातक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची अवस्थाही बिकट झाली आहे.
विकास कामांवर खर्च केले हजारो कोटी पाण्यात –
नागपूर शहरात विकासाच्या नावावर हजारो कोटी रुपये खर्च करून रस्ते बनविले. मात्र इतर शहराच्या तुलनेत मानवी विकास निर्देशांक आपल्या शहारत फार कमी आहे.शहारात सिरेज सिस्टमचा अभावामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाकडून यासाठी खर्च करण्यात आलेले तीस हजार कोटी रुपये पाण्यात गेल्या सारखेच आहे, हे दुर्दैवच म्हणाले,असेही हर्डीकर म्हणाले.
दरम्यान जयदीप हर्डीकर हे गेल्या तीन दशकांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि फेलोशिपचे विजेते आहेत. त्यांना प्रेम भाटिया स्मृती पुरस्कार आणि पत्रकारितेसाठी संस्कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.