Published On : Fri, Nov 4th, 2022
By Nagpur Today Nagpur News

डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर, रुबेलाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट्य

Advertisement

नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक

नागपूर: गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्यात व्यापक लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे ९५ टक्के बालकांना लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर आणि रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी आज टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिले.

Advertisement
Wenesday Rate
Saturday 28 Dec. 2024
Gold 24 KT 76,600/-
Gold 22 KT 71,200/-
Silver / Kg 82,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा, शासकीय आणि खासगी दवाखान्यांमध्ये होणा-या नियमित लसीकरणासंदर्भात गुरूवारी (ता.३) टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभापती सभागृहामध्ये झालेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सरला लाड, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. बकुल पांडे, डॉ. मिनाक्षी माने, डॉ. वसुंधरा भोयर, डॉ. मेघा जैतवार, डॉ. विजय तिवारी, डॉ. अतीक खान, डॉ. सुनील कांबळे, दीपंकर भिवगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) डॉ. महेश जागुलवार, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) डॉ. ज्योत्सना देशमुख, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, सहाय्यक शिक्षण अधिकारी संजय दिघोरे, आरोग्य व एनयूएचएम समन्वयक दीपाली नागरे आदी उपस्थित होते.

राज्यव्यापी मोहिमेबाबत माहिती देताना डॉ. साजीद म्हणाले की, नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना ही लस यापूर्वी देण्यात आली असेल, तरी अतिरिक्त संरक्षण म्हणून पुन्हा लस द्यावी. त्यामुळे उद्यापासून राज्यभर सुरू होणाऱ्या या लसीकरण मोहिमेत पालकांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. गोवर आणि रूबेला आजार समूळ नष्ट करण्यासाठी नागपूर शहरातील प्रत्येक बालकाला ही लस देण्यात यावी यासाठी, आरोग्यसेविका, आशा वर्कर तसेच प्राथमिक उपचार केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविणे अपेक्षीत आहे. बांधकाम साईड, शाळाबाह्य विद्यार्थी यांचाही शोध घेऊन त्यांना लस द्यावी असे आवाहन डॉ. साजीद यांनी केले.

यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेतला. सादरीकरणाद्वारे त्यांनी शहरातील प्रत्येक झोनअंतर्गत असलेली नियमित लसीकरणाची स्थिती मांडली. संपूर्ण शहरात नवजात बालकांचे पहिल्या दिवसांपासून इतर सर्व नियमित लसीकरण हे वेळेवर योग्यरित्या आणि शंभर टक्के व्हावे यादृष्टीने झोनस्तरावर नियोजन आणि कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी झोन वैद्यकीय आरोग्य अधिका-यांना दिले. नियमित लसीकरणासंदर्भात ‘मायक्रो प्लॅनिंग’ करणे, झोननिहाय खासगी डॉक्टरांची बैठक घेणे आदी निर्देशही यावेळी देण्यात आले. नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जी बालके वंचित राहिली असतील अशा बालकांचे लसीकरण व्हावे या दृष्टीने प्रयत्न करण्याचेही निर्देश देण्यात आले. याशिवाय पालकांनीही त्यांच्या बाळांचे लसीकरण झाले नसल्यास त्यांनी आपल्या जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाउन ते करून घ्यावे किंवा आपल्या नियमित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

Advertisement