नागपूर जिल्ह्यात कोरोना स्थिती हाताबाहेर गेली आहे. रोज सात हजारपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने, रुग्णालयात ना बेड मिळत नाही वेंटिलेटर. वेळेवर ॲाक्सीजन न मिळाल्याने अनेकांचे जीव गेलेय. त्यामुळे सोशल मिडिया तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अजित पारसे यांनी आपल्या वडीलांचं वर्षश्राद्ध न करता, त्यात काही पैसे जोडून कोरोना रुग्णांसाठी ‘ॲाक्सीजन ह्युमिडीफायर – व्हेंटिलेटिंग युनिट ’ कोरोना रुग्णांसाठी समर्पित केलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अजित पारसे यांनी हे यंत्र कोरोना रुग्णांसाठी समर्पित केलं आहे.
“नागपूरसह संपूर्ण राज्यात कोरोनाचं मोठं संकट आहे, वेळेत उपचार आणि व्हेंटिलेटर न मिळाल्याने तडफत मरण पत्करणाऱ्यांच्या व्यथा मी पाहू शकत नाही, त्यामुळेच आपलं सामाजाला काही देणं लागते म्हणून, मी वडील बाळासाहेब पारसे यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम रद्द केला, शिवाय काही तडजोड करत ‘ॲाक्सीजन ह्युमिडीफायर – व्हेंटिलेटिंग युनिट ‘ कोरोना रुग्णांसाठी समर्पित केलं, हिच माझ्या वडीलांसाठी खरी श्रद्धांजली आहे” अशी भावना यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित पारसे यांनी व्यक्त केली.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ७५ हजारांच्या वर गेली आहे. सक्रिय रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडली आहे. अशातच ॲाक्सीजन आणि व्हेटिंलेरशिवाय लोकांचं मरण अजित पारसे यांना व्यथित करत होतं, त्यामुळेच त्यांना वडील बाळासाहेब पारसे यांचे वर्षश्राद्ध करण्याचा कार्यक्रम रद्द केला, सध्या लॅाकडाऊनच्या संकटात व्यवसाय मंदावला असताना, काटकसर करत त्यांनी काही रक्कम एकत्र केली आणि कोरोना रुग्णांसाठी ‘ॲाक्सीजन ह्युमिडीफायर – व्हेंटिलेटिंग युनिट ‘ समर्पित केलं.
वैद्यकीय माहितीनुसार व्हेटिलेटरवर जाण्यापूर्वी ॲाक्सीजन लेव्हल कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी हे यंत्र फायदाचं ठरतं, सध्या व्हेटिलेटरवर बेड उपलब्ध नसल्याने या यंत्राची कोरोना रुग्णांना मोठी मदत होत आहे. कोरोनाच्या या संकटात अजित पारसे यांनी एक पाऊस टाकत आपलं सामाजिक भान जपलं, याचा आदर्श घेत इतरांनीही आरोग्य यंत्रणेला आधार दिला, तर कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकणे आपल्याला नक्कीच सोपे होईल.