फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचे पालकत्व:अजित पवारांनी केली शंका उपस्थित
नागपूर: नुकतेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच गृहमंत्री पद देखील पक्षाकडे मागितले होते,मात्र वरिष्ठांना वाटले याला गृहमंत्री केले तर हा कोणाचेही ऐकणार नाही,असा गौप्यस्फाट केला होता,हा एका पुतण्याने त्यांच्याच पक्षातील वरिष्ठांवर केलेला वार असल्याची शंका असून,याचाच दूसरा अर्थ त्यांची कार्यक्षमता व कतृत्वाचा हा अपमान देखील होता,हा अपमान अजित पवारांनी सरळ पक्षातील वरिष्ठांवर वार करीत राज्याच्या जनतेसमोर आणला मात्र त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी त्यांच्या कार्यसंपन्नतेवर विश्वास ठेवला नसला जरी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक साथ सहा जिल्ह्याचे पालकत्व सहज सांभाळू शकतात,अशी खरमरीत टिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला.
नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराजधानी नागपूरसह वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांच्या पालकत्वाची जबाबदारी सोपवली. यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर टिका करताना ,नुसते पुणे जिल्ह्याचे पालकत्व पार पाडताना माझ्या नाकीनऊ आलं होतं,फडणवीस सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत?असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला होता.
फडणवीस यांची कार्यक्षमता,कतृत्वसंपन्नता व निर्णयक्षमता संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर देशभरातील जनतेने बघितली आहे.सहा जिल्ह्यांचे पालकत्व फडणवीस यांच्यासारख्या नेतृत्वाला जास्त होत नाही हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कतृत्वातून दाखवून दिले असल्याचे मेश्राम म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद फडणवीस यांनी उत्तमरित्या सांभाळून दाखविल्याचे व आपली कार्यसिद्धता सिद्ध केली असल्याचे प्रतिउत्तर ॲड.मेश्राम यांनी दिले.