Advertisement
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या भेटीवर काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया देत मोठा दावा केला.
शरद पवार आणि अजित पवार काका-पुतण्या आहेत त्यामुळे त्यांच्यात भेट होणे स्वाभाविक आहे. या भेटीसंदर्भात स्वतः पवार आपली भूमिका मांडणार आहेत. या भेटीत कुणाची तरी गरज आहे. ही गरज जो भेटायला जातो त्याचीच आहे.अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर शरद पवारांना सोबत घ्यावे लागेल.
शरद पवार सोबत आले नाही, तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्नच बघत रहावे लागेल, असं कदाचित भाजपाने म्हटले असेल. हा सत्तेसाठी सुरू असलेला खटाटोप असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.