मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर त्यांनी शिंदे गट आणि भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली आहे. हे पाहता राजकीय वर्तुळात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पवार यांनी भाजपा हा जातीयवादी पक्ष आहे. राष्ट्रप्रेमी माणूस कधीही त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही असे वक्तव्य केले. शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. तर अजित पवार यांनी ३० जून रोजीच निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. ४० जणांच्या सह्यांसह हे पत्र निवडणूक आयोगात देण्यात आले आहे.
इतकेच नाही तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा केला आहे. दुसरीकडे अजित पवार सत्तेत आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र त्या शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत.