मुंबई : अजित पवार यांनी पक्षातच बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजितदादाने भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले.
उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची जागा घेतील, असा दावा राऊत यांनी केला.
एकनाथ शिंदे हे विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईत अपात्र ठरतील. त्यामुळे ते लवकरच घरी जातील. शिंदे यांच्यासोबत 16 आमारही अपत्र ठरतील, असे राऊत म्हणाले. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री बदलणार आहेत. एकनाथ शिंदे यांना हटवले जात आहे. एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांना अपात्र ठरवले जाणार आहे. भाजप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला फोडत आहे पण याचा त्यांना अजिबात फायदा होणार नाही. आगामी २०२४ च्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे.