नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवित अल्फीया शेख आणि मोहित यादव हे ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरले.
गरोबा मैदान येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये महिला गटात अल्फीया शेख तर पुरूष गटात मोहित यादवने सर्वोत्तम कामगिरी केली. महिलांच्या 63 किलो वजनगटात अल्फीयाने सर्वाधिक 67.67 गुणांची नोंद करीत बाजी मारली. या वजनगटात सोनू सरोते आणि चंदा ओझा यांनी दुस-या व तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरूषांमध्ये 66 किलो वजनगटामध्ये मोहित यादवने सर्वाधिक 76.10 गुण नोंदवित ‘चॅम्पियन्स’चा किताब आपल्या नावावर केला. या गटात मॅक्झिमस दुस-या आणि मयूर टेकाडे तिस-या स्थानावर राहिला.
विविध वजनगटातील विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला स्पर्धेचे समन्वयक माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, कन्वेनर सचिन माथने, माजी नगरसेविका कांता रारोकर, क्रीडा शिक्षक अविनाश सहारे, बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे आनंद डाबरे, लक्ष्मीकांत मेश्राम आदी उपस्थित होते.
निकाल
महिला
52 किलो वजनगट : रोहिणी मेश्राम (49.65) सलोनी कंटाळे, श्रावणी गर्जे
63 किलो : अलफीया शेख (67.67), सोनू सरोते, चंदा ओझा
63 किलोवरील वजनगट : तन्वी रहाटे (52.09), शुभांगी सुर्यवंशी, अर्चना नादर
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स : अल्फीया शेख
पुरूष
59 किलो वजनगट : विपूल राज (65.05 गुण), अमोल आवळे, रोषण छत्ते
66 किलो वजनगट : मोहित यादव (76.10), मॅक्झिमस, मयूर टेकाडे
74 किलो : अमित येरगुडे (76.10), अमर देवार, राज वर्मा
83 किलो : लाझर्स हॅम्युब्ल (73.92), हर्षल नानवटकर, नवनीत खत्री
93 किलो : सय्यद आरीफ (64.05), याशीर पटेल, सैफ अंसारी
105 किलो : मोहम्मद दानिश (68.32), तिलक यदा, शुभम खोब्रागडे
120 किलो : भूषण भदाडे, जान खान, मुबारक मसूरी
120 किलोवरील वयोगट : सुमीत बुरडे (63.03)
मास्टर्स खुला गट : युगेन स्मिथ, राजू दोडके, राजेश गौर
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स : मोहित यादव
****
Women
weight group 52 kg: Rohini Meshram (49.65) Saloni Kudhe, Shravani Garje
63 kg : Alfia Shaikh (67.67), Sonu Sarote, Chanda Ojha
Above 63 kg: Tanvi Rahate (52.09), Shubhangi Suryavanshi, Archana Nadar
Champion of Champions : Alfia Shaikh
Mens
Weight group 59 kg: Vipool Raj (65.05 points), Amol Awle, Roshan Chhatte
66 kg: Mohit Yadav (76.10), Maximus, Mayur Tekade
74 kg : Amit Yergude (76.10), Amar Dewar, Raj Verma
83 kg: Lazarus Hamoubl (73.92), Harshal Nanwatkar, Navneet Khatri
93 kg : Syed Arif (64.05), Yashir Patel, Saif Ansari
105 kg : Mohammad Danish (68.32), Tilak Yada, Shubham Khobragade
120 kg : Bhushan Bhadade, Jan Khan, Mubarak Mussoorie
Age group above 120 kg: Sumeet Burde (63.03)
Masters Open Group : Eugene Smith, Raju Dodke, Rajesh Gaur
Champion of Champions: Mohit Yadav