Published On : Tue, Dec 24th, 2019

अखिल भारतीय कवी संमेलन २५ डिसेंबरला

Advertisement

मनपाचे आयोजन : देशभरातील नामवंत कवींची उपस्थिती

नागपूर : गांधीबाग उद्यान नुतनीकरण वर्धापन दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती आणि माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती असे त्रिवेणी औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने येत्या २५ डिसेंबरला २१व्या अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गांधीबाग उद्यानाच्या हिरवळीवर नि:शुल्क आयोजित अखिल भारतीय कवी संमेलनामध्ये देशभरातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२५ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, कार्यक्रमाचे संयोजक ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आदी उपस्थित राहतील.

अखिल भारतीय कवी संमेलनाचे हे २१वे वर्ष आहे. यावर्षी देशभरातील नामवंत कवी आपल्या उत्कृष्ठ रचना सादर करणार आहेत. इंदुर येथील ज्येष्ठ कवी सत्यनारायण सत्तन (इंदुर) आपल्या ओज रस मधील कवितांनी मंत्रमुग्ध करतील. मध्यप्रदेशातील मुरैना येथील हास्य व्यंग कवी तेजनारायण शर्मा, राजस्थानमधील बारा येथील हास्य रसचे कवी सुरेंद्र यादवेंद्र, आगरा येथील वीर रसचे फनकार ऐलेश अवस्थी, नागपुरातील प्रतिनिधी कवी म्हणून वरीष्ठ गीतकार दयाशंकर मौन, राजस्थान मधील विजयनगर येथील गीत गझलकार कवयित्री अंकिता चिंगारी आदी सर्व कवी आपल्या रचना सादर करतील.

१९९८ मध्ये गांधीबाग उद्यानाच्या नुतनीकरणानंतर दरवर्षी हे संमेलन आयोजित करण्यात येते. या कवी संमेलनात आतापर्यंत देशभरातील सुमारे १०३ कवींनी आपल्या रचनांचे सादरीकरण केले आहे. या कवी संमेलनामध्ये शहरातील सर्व कलारसिक, पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement