कामठी :-संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरस नावाचा विषाणू हा भारतासह महाराष्ट्रात सुद्धा पसरला आहे .ही परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती चा एक भाग म्हणून कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने निर्देशित केलेल्या आदेशांचे संपूर्ण नागरीकानी काटेकोर पने पालन करून देशसेवेच्या भावनेतून प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान राज्याचे पशु संवर्धन मंत्री सुनीलबाबू केदार यांनी आज कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थे संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत व्यक्त केले.
याप्रसंगी कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नोयंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करीत असलेल्या उपाययोजना, होम कॉरोनटाईन झालेल्या नागरिकांची संख्या , औषधोपचार, आरोग्य व्यवस्था आदी बाबत आढावा घेतला याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, नगरसेवक नीरज लोणारे, नगरसेवक मो आरिफ कुरेशी , नागसेन गजभिये आदी उपस्थित होते.तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांत एसडीओ श्याम मदनूरकर, बीडीओ सचिन सूर्यवंशी, नायब तहसीलदार आर जी ऊके, वैद्यकिय अधीक्षक डॉ धीरज चोखानद्रे , वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी, पोलीस निरीक्षक देविदास कठाळे आदी उपस्थित होते
संदीप कांबळे कामठी