नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून विद्यार्थांनी पेपर सोडविण्यास सुरुवात केली आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रश्नपत्रिकेचे लिफाफे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान परीक्षेसाठी एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विज्ञान शाखा: 7, 60, 046, कला शाखा: 3,81, 982,वाणिज्य: 3, 29, 905, वोकेशनल: 37, 226, आय टी आय: 4750 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेत कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी बोर्डाकडून घेण्यात येणार आहे.
राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक :परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी दिली आहे. विद्यार्थांना अर्धातास आधी परिक्षाकेंद्रावर हजर राहण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
पहिला पेपर इंग्रजीचा …
२१ फेब्रुवारीपासून बारावीची परिक्षा सूरू होत आहे. पहिला पेपर इंग्रजीचा आहे. २२ ला हिंदी, २३ ला मराठी, २४ ला मराठी प्राकृत/संस्कृत, २६ ला वाणिज्य संघटन, २७ ला भौतिकशास्त्र, २८ ला गृहव्यवस्थापन, २९ फेब्रुवारीला रसायनशास्त्र, २ मार्चला गणित, ४ ला बालविकास, कृषी विज्ञान, ५ ला सहकार, ६ मार्चला जीवशास्त्र विषयाचा पेपर आहे.
परीक्षा केंद्रांवर पालकांची गर्दी –
बारावी हे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने फार महत्त्वाचे वर्ष आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांसह पालकही तणावात राहतात.आज पहिलाच पेपर असल्याने मुलांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकही सोबत आले होते.