नागपूर: शहरातील सदर येथील हॉटेल अशोका येथे रात्री उशिरा तीन जणांच्या टोळक्याने एका महिलेचा पाठलाग केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे महिलेच्या मनात भीती निर्माण झाली होती. तिने घटनेची तक्रार सदर पोलिस स्टेशमध्ये केली. याप्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.मनोज जीवतराम छाब्रा (वय ५३, रा.पत्ता फ्लॅट नंबर 301,अशा रेसिडेन्सी शंकर नगर, राजेश कुमार अमरलाल तलरेजा (वय ४३, नवजीवन कॉलनी अमरावती), सुरज नारायण कुऱ्हाडकर वय 25 रा. गणपती नगर अमरावती एमआयडीसी रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
22 एप्रिल रोजी संध्याकाळी महिलांचा एक गट सदर येथील हॉटेल अशोका येथे जेवणासाठी गेला होता.दुसऱ्या टेबलावर बसलेले तीन पुरुष जेवणादरम्यान महिलांकडे वाईट नजरेने पाहू लागले. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर महिला पार्किंग एरियाकडे गेल्या तेथे त्यांच्यामागे तिघेही पुरुष होते. त्यातील एक महिला कारमधून घरी जाण्यास निघाली.आरोपीने तिचा पाठलाग करत महिलेची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याकडे पाहत अश्लील चाळे केले. महिलेच्या घराच्या लॉबीमध्ये प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून महिलेने घुसखोराच्या हालचाली टिपल्या आणि तातडीने तिच्या पतीला या घटनेची माहिती दिली.सदर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त राहुल मदने (डीसीपी) झोन II आणि सदरचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक आणि मानवी पाळत ठेवण्याच्या संयोजनामुळे तिघांनाही अटक करण्यात आली.
दरम्यान या घटनेमुळे नागपुरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरिणीवर आला. रात्री घराबाहेर पडण्यास महिलेच्या मनात भीती निर्माण झाली.