काटोल: सध्या राशन दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे कोरोना व्हायरस पसरु शकतो. सोशल डिस्टन्सचे पालन करून वाटप करण्याचे आव्हाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी काटोल व नरखेड तालुक्यातील २१६ रेशन दुकानांमध्ये जवळपास एक हजार लिटर सॅनेटायझरचे वाटप केले आहे.
राशन दुकानातील गर्दी लक्षात घेता येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब सलील देशमुख यांच्या लक्षात येताच त्यांनी काटोल व नरखेड तालुक्यातील सर्व राशन दुकानदार यांसोबत फोनवरून चर्चा केली. कोणत्याही प्रकारची गर्दी न होता सोशल डिस्टन्स पाळून वाटप करण्याचे आव्हान सलील देशमुख यांनी केले होते. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सॅनेटायझर मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
हाच प्रश्न लक्षात घेऊन सलील देशमुख यांनी काटोल व नरखेड तालुक्यातील जवळपास २१६ राशन दुकानांमध्ये सॅनेटायझर उपलब्ध करून दिले. जवळपास हजार लिटर हे सॅनेटायझर असून त्याचे वाटप जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्यामार्फत करण्यात येत आहे.आतापर्यंत ६० टक्के वाटप झाले असून उर्वरित ४० टक्के वाटते येत्या दोन दिवसात पूर्ण होईल. या कार्यासाठी सलील देशमुख यांना अनेक सामाजिक संस्थांनी सुद्धा सहकार्य केले आहे.
या वाटप प्रक्रियेमध्ये तारकेश्वर शेळके, समीर उमप, जयंत टालाटूले, नंदलाल मोवाडे, वैभव दळवी, अजय लाडसे, गणेश चन्ने, संदीप भुतडा, सतिश रेवतकर, डॉ अनिल ठाकरे, बंडू राठोड, गणेश सावरकर, संजय राऊत, नितीन ठवळे, निशिकांत नागमोते, सतिश पुंजे, प्रविण मोहरीया,प्रमोद राठोड, अतुल पेठे, पंकज देशमुख, स्वप्नील व्यास, अनिल साठवणे, मंगेश नासरे, अमित गायधने ,उज्ज्वल भोयर,सचिन चरडे, योगेश मांडवेकर, पंकज क्षीरसागर, अजय सोमकुवर, किशोर धांडे, अजय देशमुख हे सहकार्य करीत आहेत.