नागपूर. खासदार क्रीडा महोत्सवातील क्वान की डो मटेरियल आर्ट स्पर्धेमध्ये अलोक ठाकरे व पायल कोरेने 18 वर्षाखालील वयोगटात सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. विवेकानंद नगर येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 18 वर्षाखालील वयोगटात मुलांच्या 55 किलोवरील वजनगटामध्ये अलोक ठाकरेने प्रथम, सुशील राऊळेने द्वितीय व सिद्धेश ढोरेने तृतीय क्रमांक पटकावला.
18 वर्षावरील मुलींच्या 50 किलोवरील वजनगटामध्ये पायल कोरेने सुवर्ण पदकावर मोहोर उटविली. पायलकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या दिप्ती पटलेला रौप्य पदकावर तर क्रिष्णाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 15 ते 17 वर्ष वयोगटात 41 किलोवरील वजनगटात मुलांमध्ये अथर्व श्रीपाडवार विजेता ठरला. त्याने अथर्व चौधरीचा पराभव केला. राज उगरेजिया ने तिसरे स्थान प्राप्त केले. मुलींमध्ये अक्षरा ठाकरेने बाजी मारली. संस्कृती बारसेने दुसरे तर आरुषी इडुलकरने तिसरे स्थान प्राप्त केले. 15 ते 17 वर्ष वयोगटात मुलींच्या 41 किलो वजनगटामध्ये सबिया अंसारीने सुवर्ण, माही चावडेने रौप्य व नंदिनी पाठराबेने कांस्य पदक पटकावले.
निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)
15 ते 17 वर्ष वयोगट : 41 किलोवरील वजनगट
मुले : अथर्व श्रीपाडवार, अथर्व चौधरी, राज उगरेजिया
मुली : अक्षरा ठाकरे, संस्कृती बारसे, आरुषी इडुलकर
15 ते 17 वर्ष वयोगट : 41 किलो वजनगट
मुली : सबिया अंसारी, माही चावडे, नंदिनी पाठराबे
18 वर्षावरील मुले : 55 किलोवरील वजनगट
अलोक ठाकरे, सुशील राऊळे, सिद्धेश ढोरे
18 वर्षावरील वयोगट : 50 किलोवरील वजनगट
मुली : पायल कोरे, दिप्ती पटले, क्रिष्णा
***
Results (1st, 2nd & 3rd)
Age Group 15 to 17 years : Weight group above 41 kg
Boys: Atharva Sripadwar, Atharva Chaudhary, Raj Ugarejia
Girls: Akshara Thackeray, Sanskriti Barse, Aarushi Idulkar
Age group 15 to 17 years : weight group 41 kg
Girls: Sabia Ansari, Mahi Chawde, Nandini Patharabe
Above 18 years Boys: above 55 kg
Alok Thackeray, Sushil Raule, Siddesh Dhore
Age group above 18 years : above 50kg
Girls : Payal Kore, Dipti Patle, Krishna