कन्हान : – विकास प्राथमिक शाळा, बळीराम दखने हायस्कुल कन्हान येथे शाळेची माजी विद्यार्थिनी डॉ. सुरेखा दयानंदजी गडे व्दारे शाळेतील ५० गरीब गरजु विद्यार्थ्यासाठी भोपाल वरुन स्कुुल बँग्स पाठवुन वितरण करण्यात आल्या.
विकास प्राथमिक शाळा व बळीराम दखने हायस्कुल कन्हान च्या माजी विद्या र्थींनी डॉ.सुरेखा गडे स्वत: बँग्स वितरण करण्याकरिता उपस्थित होवु शकल्या नाहीत पण त्यांचे वडील श्री दयानंदजी गडे, भाऊ श्री रणजित गडे व दखने हाय स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. विशाखा ठमके मँडम, विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेन्द्र खंडाईत सर, सौ. गजभिये मँडम यांचे हस्ते शाळेतील प्रायमरी च्या २० व हायस्कुलच्या ३० अशा एकुण ५० गरजु विद्यार्थ्यांना बँग्स चे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी श्री पसीने सर, चौधरी सर, सौ.बारई मँडम, सौ. मोटघरे मँडम प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. चौकसे मँडम यांनी तर आभार मुख्याध्यापक श्री. राजेन्द्र खंडाईत सर यांनी व्यकत केले.