Published On : Wed, Jul 12th, 2023

अमरनाथ यात्रा एक अभूतपूर्व अनुभव…

Advertisement

अमरनाथ यात्रा खूप कठीण आहे , पुनर्जन्म झाल्याचा आनंद मिळतो ह्या गोष्टी ऐकून होतो, वाटायचं समोरचा अतीशयोक्ती करतोय. प्रेतेक्ष्य अनुभव घेतल्यावर खात्री पटली. आपल अस्तित्व किती खुज आहे हे प्रकर्षाने जाणवले. पदोपदी आपली मृत्यू सोबत मुलाखत होते आणि या विश्वाच्या नियांत्या प्रती आपली श्रद्धा मजबूत होत जाते. हजारो भक्त बर्फा नी बाबा चया दर्शनाला हजेरी लावतात. कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकत, ते होतांना पाहिलं सुद्धा. एक गोष्ट मात्र नक्की की जो पर्यंत बाबा चा बुलावा येत नाही, ही यात्रा घडत नाही. कितीही सावधानी बाळगा..या पहाडावर बाबा ची अधिसत्ता आहे. पिस्सुटोप, चंदनवाडी, शेषनाग, गणेश टॉप, panchtarni आणि गुहा…येथील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. हे सगळ अनुभवायचं असेल तर यात्रा चंदनवाडी कडून करावी लागेल. गुहेत बाबा आपल्या कुटुंबा सोबत विराजमान आहे. त्यांचं ते रूप डोळ्यात मावत नाही. त्या दोन कबुतरांचा दर्शन हा भाग्याचा योग आहे. पूर्ण प्रवासात कुठेही पक्षी दिसत नाही…पण गुहेत ह्या दोन कबुतरतांच वास्तव्य आहे. दैवी चमत्कार आहे दुसर काय… आज पर्यंत केलेल्या सर्व यात्रां मधील अतिशय अतिशय कठीण यात्रा म्हणजे अमरनाथ यात्रा .,याचे कारण म्हणजे येथे जाणारा रस्ता एकीकडे पर्वत पहाड दुसरीकडे वेगाने वाहत असलेली नदी निसरडे व अरुंद रस्ते.केव्हा वातावरण कशाप्रकारे बदल होइल याचा नेम नसतो .

पाच जुलैला सकाळी साडेपाच वाजता चंदनवाडी वरून निघाल्यावर दुसऱ्या दिवशी जवळपास दुपारी दोन वाजता अमरनाथ गुफेजवळ पोहोचलो रस्त्यात तुम्ही घोडा करा पालखी करा तरीपण तुम्हाला दीड किलोमीटर पायी उतरावे व चढावे लागतेच लागतेच .डोली वाला गुफे जवळ खाली पायऱ्यांपाशी सोडल्यानंतर चांगल्याच पायऱ्या वर चढून दर्शनासाठी जावे लागते तिथे गर्दी बघून थोड्या दूरपर्यंत कधी डोली जाऊ देतात व कधी नाही तरी शेवटच्या शंभर एक पायऱ्या तरी आपल्याला चढाव्या लागतातच. हवामानात असलेली प्राणवायूची कमतरता ,हवेचा दाब ,सारखा वळणदार रस्ता यामुळे तब्येतीवर पण चांगलाच परिणाम होतो हा सर्व त्रास सहन करून ज्यावेळेला मंदिरात प्रवेश केला त्यावेळेस मात्र एक अभूतपूर्व समाधान मिळाले.
यात्रेच्या सुरुवातीसच आम्ही गेल्यामुळे व परमेश्वर कृपेमुळे तीनही संपूर्ण उंचीच्या बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन झाले.

Advertisement

बाबा येथे आपल्या संपूर्ण कुटुंबासहित विराजमान आहेत. यावेळेस काय करावे काय नाही हेच सुचत नाही.एकीकडे संपूर्ण विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून घेण्याची इच्छा असते तर दुसरीकडे डोळे बंद करुन परमेश्वराची प्रार्थना करावीशी वाटते. गर्दीमुळे येथे पण भाविकांना वेळ कमीच मिळतो,पण जो मिळतो त्यामध्ये डोळ्यात व हृदयात ते दृश्य व भाव साठवून घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा व आकांक्षा असते.

संपूर्ण प्रवासात कुठेच पक्षी दिसले नाहीत परंतु बाबाच्या गुफेमध्ये दोन्ही अमर पक्ष्यांचे दर्शन झाले.देवाची लीला. या दर्शनामुळे आलेला सर्व थकवा निघून जातो हे नक्कीच. हा स्वतःला आलेला अनुभव आहे. या संपूर्ण कठीण प्रवासामध्ये सुद्धा आपण नैसर्गिक सौंदर्याचा खूप काही आनंद घेऊ शकतो.एकीकडे बर्फांचे डोंगर व बर्फ वितळेने सुरू झाल्यामुळे तयार होणारी नदी,ठिकठिकाणी दिसणारे लहान मोठे धबधबे , झरणे आपल्या डोळ्याचे पारणे फेडते. बर्फावरून सूर्याच्या किरनांचे परिवर्तन व ते दृश्य. सर्वच अतिशय विलोभनीयव आपला थकवा दूर करण्यास कारणीभूत ठरते.

सहा तारखेला रात्रौ एक वाजता आम्ही दर्शन घेऊन खाली वापस बालटालला पोहचलो व जवळपास दोन तासानंतर पाऊस सुरू झाला. दुसऱ्या दिवशीची यात्रेचा पहिला जथ्था चार वाजता निघाल्यावर त्याला चार किलोमीटर वरून वापस पाठविण्यात आले व नंतर तीन दिवस यात्रा बंदच होती.

शेवटी एक गोष्ट मात्र नक्की, त्याचा बुलावा आल्या शिवाय दर्शन काही होत नाही.पुन्हा एकदा सर्व शक्तिमान परमेश्वराचे आभार . आपल्या शुभेच्छा व सद्भावनामुळेच आम्ही सुखरूप पोहोचू शकलोत्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद.🙏🏻 डॉ संजय उत्तरवार , नागपूर. लेखक है नागपुरातील एक गणमाण्य शिक्षा विद असून इंजिीअरिंग कॉलेज चे प्रिन्सिपॉल आहेत आहेत . सोबतच व्हॉईस ऑफ मुकेश नावांनी विख्यात आहेत.