कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उन्हाळ्यात होणारी पाणी टँचाई लक्षात घेता नागरिकांना पाण्याची सोय व्हावी या मुख्य उद्देशाने कामठी -मौदा विधानसभा चे आमदार टेकचंद सावरकर यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच आज सकाळी 11 वाजता कामठी तहसिल कार्यालय सभागृहात तालुकास्तरीय पाणी टंचाई आढावा सभा घेतली.ज्यामध्ये प्रस्तावित पाणी टंचाई आराखडा मंजूर करून पाणी टंचाई बाबतचेअतीरिक्त प्रस्ताव तातडीने सादर करून हे सर्व पाणी टंचाई प्रस्तावित आराखडे लवकरात लवकर मंजूर करावे तसेच ,राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत मागील तीन वर्षात कामे पूर्ण झाले की नाही त्याची तपासणी करण्याचे निर्देश ताहसीलदारला देण्यात आले .
हि तालुकास्तरीय पाणी टंचाई आढावा सभा आमदार टेकचंद सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी जी प सदस्य व नागपूर जिल्हा परिषद चे विरोधी पक्ष नेता अनिल निधान, जी प सदस्य नाना कंभाले, जी प सदस्य मोहन माकडे,,,पंचायत समिती सभापती उमेश रडके, ,उपसभापती आशिष मललेवार,पंचायत समिती सदस्य सविता जिचकार, पूनम माळोदे, शिला हटवार, दिलीप वंजारी, यासह तालुक्यातील समस्त सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक गण प्रामुख्याने उपस्थित होते.
कामठी पंचायत समितिच्या वतीने सन 2019-20 चा पाणी टंचाई कृती आराखडा प्रस्तावित करण्यात आला ज्यामध्ये भाग 1 1 ऑक्टोबर 2019 ते डिसेंम्बर 2019,भाग 2 मध्ये जानेवारी 2020 ते मार्च 2020 व भाग 3 मध्ये एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीतिल पाणी टंचाई कृती आराखड्याची समावेश होता या आराखड्याला मंजुरी प्राप्त झाली असून या आराखड्यात नळयोजना विशेष दुरुस्ती,तात्पुरती पूरक नळ योजना,नवीन विंधन विहीर,सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण,खाजगी विहिरीचे अधिग्रहण,टँकर माग्नि आदी कामाचा त्यात समावेश करून एकूण 74 गावासाठी विविध उपाययोजनेअंतर्गत कोटी रुपये च्या आतील खर्चाचा आराखडा मंजूर करण्यात आला.आजपर्यंत तालुक्यात महाजल योजना,भारत निर्माण पाणी पुरवठा योजना,रोहयो सिंचन तलाव,जलस्वराज्य आदींसह पाणी उपलब्धतेसोबतच इतर योजना राबविण्यात येतात.
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी म्हणून शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतो तरीही पाणी समस्या जाणवते तेव्हा या बाबीकडे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने गांभीर्याने लक्ष पुरवावे .तर या मंजूर पानी टंचाई आराखड्यात एकुन 74 गावे घेण्यात आली ज्यामध्ये विविध उपाययोजनेअन्तर्गत कोटी रूपये च्या आतील खर्च ला मंजूरी देण्यात आली आहे यानुसार लघु नळ योजना विशेष दुरुस्तीत एकुन 10 कामे घेण्यात आली , नळ योजना विहीरीचे खोलिकरन व् आडवे बोर, नळ योजनेची टाकीची दुरुस्ती, नळ योजना विहीरीचे आडवे बोर, नळ योजना विहीरीचे खोलिकरन व् आडवे व् उभे बोर चा समावेश आहे.707 विन्धन विहीर, खाजगी विहीरीचे अधिग्रहण, टैंकर मागणी मंजूर करण्यात आली.या आढावा बैठकीला ,तहसीलदार अरविंद हिंगे,गटविकास अधिकारी अंतुर्कर,गंनवीर,दिघाडे तसेच जी प पाणीपुरवठा,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इतर प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच तालुक्यातील समस्त गावातील सरपंच,उपसरपंच सचिव गण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी