Advertisement
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात आगमन झाले. विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी जयघोष करीत जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या मंचावर येत शाह यांनी जमलेल्या समर्थकांना हात उंचावत अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भव्य हार घालून त्यांचे स्वागत केले.