आर्थिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणा-या मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने ‘अमृतकाल : विकसीत भारत – 2047’ या तीन दिवसीय गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेचा शनिवार, 8 फेब्रुवारी रोजी समारोप होत आहे.
हॉटेल सेंटर पॉइंट, रामदासपेठ येथे सायंकाळी 6.30 वाजता या परिषदेला केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्यासह नवाब ऑफ दलाल स्ट्रीट नावाने परिचित उद्योगपती रमेश दमाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
‘अमृतकाल:विकसीत भारत 2047’ परिषदेचे 1, 2 व 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाल्यानंतर दोन दिवस विजय केडिया, श्रीराम कृष्णन, रिधम देसाई , मनीष बन्सल या तज्ज्ञांचे भारतीय अर्थशास्त्र, गुंतवणूक, शेअर बाजार आणि संपत्ती निर्मिती या विषयांवर मार्गदर्शन लाभले होते.
या परिषदेचा समारोप शनिवारी होत असून हा कार्यक्रम नि:शुल्क आहे. विद्यार्थी, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन मनी बीचे प्रबंध संचालक आशुतोष वखरे व संचालक शिवानी दाणी-वखरे यांनी केले आहे.