Advertisement
नागपूर: आजपासून संपूर्ण राज्यात भाजपाचे महाएल्गार आंदोलन छेडण्यात येत असून नागपूर जिल्ह्यात मौदा तालुक्यातील कोंदामेंढी येथे उद्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता माजी पालकमंत्री व भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शेतकर्याच्या दुधावा भाववाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात आ. टेकचंद सावरकर व भाजपाचे सर्व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. नागरिक शेतकर्यांनीही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.