Advertisement
नागपूर:सक्करदरा परिसरातील बॉलीवूड सेंटर पॉइंटच्या सीमा भिंतीला 37 वर्षीय ऑटोचालकाने गळफास लावून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रकाश हरीशचंद्र मुनिया असे मृताचे नाव असून तो पाचपाओली येथील रहिवासी आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हा कर्जबाजारी होता.
त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून त्याने शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री हे टोकाचे पाऊल उचलले.
दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे