Published On : Fri, Jun 14th, 2024

नागपुरातील हिंगणा परिसरात ऑटोचालकाची अज्ञात व्यक्तींने केली हत्या

Advertisement

नागपूर : शहरात हत्यांचे सत्र सुरूच आहेत. कामावर गेलेल्या एका ऑटोचालकाची अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून ऑटोचालकाला मृतदेह त्याच्याच गावाच्या मार्गावर सापडला.

माहितीनुसार, दिनेश हरीदास नगराळे (५०, वडगांव गुजर, गुमगाव, हिंगणा) असे मृतकाचे नाव आहे. तो ऑटोचालक आहे. टेंभरी बुटीबोरी पर्यंत तो ऑटो चालवायचा. नेहमीप्रमाणे तो दुचाकीने त्यांच्या मोठ्या भावाच्या घरी जायचे व तेथे पार्क केलेला ऑटो घेऊन कामावर जायचे. १३ जून रोजी ते सकाळी साडेसात वाजता घरून निघाला. मात्र रात्री उशिरा पर्यंत तो घरी पोहोचलाच नाही.

Advertisement

गावातीलच दोन जणांनी येऊन दिनेश हे समृद्धी महामार्गापासून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले असल्याचे सांगितले. कुटुंबीय तेथे पोहोचले असता त्यांच्या डोके, छातीतून रक्त निघत होते व दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली होती. कुणीतरी त्यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याचे दिसून येत होते. जवळच पाच फूटाचा बांबूदेखील पडला होता. दिनेश यांना एम्स मध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दिनेश यांची पत्नी अलका यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.