Published On : Mon, Feb 17th, 2020

रस्ते अपघातातील मृतांची वाढती संख्या चिंताजनक

मोबलाईज युवर सिटी (MYC) अंतर्गत कार्यशाळा

नागपूर : देशात दररोज ४०० लोक रस्ते अपघातात मृत्यूमूखी पडतात. कोणतीही आतंकी (भहयाड हल्ला) हल्यात मृत्यूमुखी पडणारी संख्यापेक्षा ही जास्त प्रमाणात आहे. म्हणून सगळया सरकारी विभागाने आणि स्थानीक स्वराज्य संस्थांनी याच्याकडे जास्त गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे, असे आवाहन श्रीमती सारिका पांडा राहागिरी फाउंडेशनच्या ट्रस्टी यांनी रस्ते सुरक्षा या विषयावर आज (ता.१७ फेब्रुवारी) रोजी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत केलेत.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हल्पमेंट कारर्पोरेशन लि. व्दारा आयोजित मोबालाईज युवर सिटी (MYC) कार्यक्रमाचे अंतर्गत एका कार्यशाळचे आयोजन होटेल तुली ईम्पीरीएल येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमात स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्य. अधिकारी महेश मोरोणे, MYC ची जयश्री जिंदल, WRI इंडीयाची प्रियंका सल्खलन आदी प्रामुख्याने ‍ उपस्थित होते.

श्रीमती पांडा यांनी सांगितले की, देशात रस्ते अपघातात सर्वांत जास्त मृत्यूमुखी पडणारे पायी चालणारे आणि दुचाकी वाहनावर चालणारे लोक आहेत. हे सगळे मध्यम आणि अल्पउत्पन्न गटाचे लोक आहेत. प्रति वर्ष देशाच्या 4.22 लाख करोड रुपयाच्या GDP च्या नुकसान या अपघातामुळे होतात. दरवर्षी दिड लाखापेक्षा जास्त लोक अपघाताने मृत्यूमुखी पडतात. 3 लाख लोक अपघातामुळे जखमी होतात. त्या पुढे बोलतांना म्हणाल्या की, देशात पायी चालणा-या लोकांची संख्या जास्त असुनही त्यांच्यासाठी चांगले फुटपाथ नाही. त्यांनी आवाहन केले की, सरकारने याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.

स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्य. अधिकारी महेश मोरोणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शहराला पादचारी पूरक (FRINDLY) बनवीण्याची गरज आहे. रस्त्यावर पहिला हक्क त्यांचा आहे. त्यानंतर सायकल, सार्वजनिक वाहन आणि सर्वांत शेवटी निजी वाहनांचा आहे. त्यांनी सांगितले की, नागपूरमध्ये सार्वजनिक वाहनाच्या क्षेत्रात क्रांती होऊन राहीली आहे. आता आम्ही प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्राथमिकता देत आहे.

प्रियंका सल्खालन यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, रस्त्यावर निजी वाहन कमी करण्याच्या दृष्टीने जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी सगळया विभागाने सोबत येऊन काम केले तर रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

जयश्री जिंदल :- MYC कार्यक्रमासाठी युरोपीय संघ यांनी नागपूर, अहमदाबाद आणि कोची शहराची निवड केलेली आहे. आणि या शहरात कार्बन उर्त्सजन कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करुन राहीलो आहे.

कार्यक्रमात स्मार्ट सिटीचे महाप्रबंधक राजेश दुफारे, देवेंद्र महाजन, उदय घिये, प्रनिता उमरेडकर, शुभांगी गाढवे, आरटीओ चे विनोद जाधव, ट्राफिक अभियंता शकील नियाजी, सहा. पोलीस निरीक्षक श्री. पोटदुखे व विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement