मुंबई : मुंबईतील महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयात गुरुवारी सायंकाळी एका अज्ञात महिलेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड सुरू केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी फडणवीस यांच्या कार्यालयाचे गेट तोडून बाहेरील नावाची पाटी उखडून टाकण्याचा प्रयत्न या महिलेने केला. माहितीनुसार, ही महिला तिच्या घराशी संबंधित काही प्रकरणामुळे चिंतेत होती.
महाराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, अज्ञात महिलेने गुरुवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात जाऊन त्यांची नेम प्लेट जमिनीवर फेकली. काही कर्मचारी आणि पोलीस हवालदारांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती त्यांना चुकवण्यात यशस्वी झाली आणि दक्षिणेकडील गेटमधून बाहेर पडली. मरीन ड्राईव्ह पोलीस या अज्ञात महिलेचा शोध घेत आहे.
ही महिला पासशिवाय मंत्रालयाच्या आवारात दाखल झाली होती. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच तेथे ठेवलेल्या फ्लॉवरपॉट्सचेही नुकसान केले. प्राथमिक वृत्तानुसार, महिला सुरक्षा प्रोटोकॉलला मागे टाकत सचिवालयाच्या गेटमधून मंत्रालयात दाखल झाली होती.
महिलेच्या गोंधळाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचे फुटेजही सोशल मीडियावर लीक झाले आहे.या घटनेमुळे अतिदक्षता असलेल्या शासकीय इमारतीमध्ये पास नसताना कोणी प्रवेश कसा करू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.