लोहमार्ग पोलिसांनी दोन लाखांचे दागिने केले परत, नंदीग्राम एक्स्प्रेसमधील घटना
नागपूर: जीवघेण्या महागाइत जीवन जगणेच कठीन झाले आहे. जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे प्रामाणिकता संपत चालली आहे. मात्र, अल्पशा लोकांमुळे आजही प्रामाणिकता जिवंत ठेवली आहे. लोहमार्ग पोलिसांनी एका प्रवाशाचे जवळपास दोन लाख रुपये किंमतीचे दागिने परत करून प्रामाणिकता आणि कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला. दागिने परत मिळताच रडत आलेल्या कुटुंबाच्या चेहºयावर हास्य फुलले
चेंबूर, वाशी नाका, मुंबई येथील निवासी शशीकला बाबुराव दुशिंग (६५) आणि त्यांचे कुुटुंब असे एकू १४ लोक औरंगाबदला लग्नासाठी गेले होते. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर नागपुरातील दीक्षाभूमीचे दर्शन घेण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे सर्वचजन ११४०१ मुंबई – नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेसच्या ए-४ बोगीने औरंगाबाद ते नागपूर असा प्रवास करीत होते. आज सायंकाळी १६.४५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी आली. उतरण्याच्या धावपळीत त्यांची लेडीज पर्स बर्थखाली पडली. त्यापर्समध्ये ४ तोळ्याची सोनसाखळी आणि अडीच तोळ्याचे मंगळसूत्र आणि ३ हजार २०० रुपये रोख असा मुद्देमाल होता.
स्टेशन बाहेर पडल्यानंतर शशीकला यांना पर्स दिसली नाही. पर्स मध्ये दागिने असल्यामुळे त्यारडायला लागल्या. रडता रडता त्या लोहमार्ग ठाण्यात पोहोचल्या. सारा प्रकार त्यांनी उपनिरिॅक्षक रवी वाघ यांना सांगितला. लगेच उपनिरीक्षक वाघ, उपनिरीक्षक रोशन खांडेकर, पोलिस शिपाई रोशन मोगरे, प्रतीक्षा दमके आणि दीपाली निकम यांनी एस-४ बोगीत जाऊन शोध घेतला असता पर्स ६७ नंबरच्या बर्थखाली मिळाली. पोलिसांनी पर्समधील दागिन्यांची खात्री करून घेतली. तसेच ती पर्स ठाण्यात आणुन कायदेशिर कारवाईनंतर शशीकला यांना रितसर देण्यात आली. पर्स मिळताच त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले. त्यांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.