नागपूर : नागपुरात आज सकाळी अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करत शहातील मुख्य चौक असलेला व्हेरायटी चौक जाम केला. सरकारने अंगणवाडी सेविकांना वेठीस धरल्याचा आरोप करत आंदोलक महिलांनी सरकारचा तीव्र निषेध केला. तसेच सरकारविरोधात आंदोलन करत चौकातच त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
विशेष म्हणजे या अंगणवाडी सेविका सरकारच्या विरोधात सातत्याने आंदोलने करत आहेत. आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी सरकारकडे त्या वारंवार विनंती करत आहे.
‘या’ आहेत अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या :-
– सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा
-दरमहा 26,000 रुपये पगार दिला जावा
– तसेच ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसह दरमहा 20,000 रुपये पगाराची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.