Advertisement
नागपूर : रामटेकमध्ये जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती देवलापार पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून एक ट्रक अडवला.
ट्रकची झडती घेतली असता, गुरे लपवण्यासाठी टोमॅटोच्या कॅरेटचा वापर केल्याचे पोलिसांना आढळून आले. 28 गुरे गाडीमध्ये निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सर्व 28 गुरांची सुटका केली आणि ट्रकसह 19 लाख 45 हजार रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालक अलाउद्दीन रज्जाक शाह आणि त्याचा साथीदार अश्लम खान यांना अटक करण्यात आली आहे.