नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सेपाक टॅकरामध्ये अंजुमन हामी-इ आणि द इमोर्टल संघाने पुरुष व महिला गटात अजिंक्यपद पटकावले. गाडीखाना महाल येथे ही स्पर्धा पार पडली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात अंजुमन हामी-इ संघाने ब्लॅक पँथर संघाचा पराभव करून विजय मिळविला. अंजुमन हायस्कुल ने तिसरे स्थान पटकाविले. महिलांच्या अंतिम सामन्यात द इमोर्टल संघाने एन.एस.टी.ला मात देऊन जेतेपद प्राप्त केले. स्काय किकर्स संघाने तिसरे स्थान प्राप्त केले.
रोशन सिंग आणि चेतना रंगोला यांना सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आले.