नागपूर : शहरातील भीमनगर झाेपडपट्टी येथील एका मजुरांच्या मुलीने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण करत मोलाची कामगिरी केली आहे. मुंबई मंत्रालयात क्लर्क म्हणून तिची नियुक्ती झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या अंकिताने कुठल्याही प्रकारची खासगी शिकवणी न लावता केवळ वाचनालयात अभ्यास करून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केल्याने तिचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
वाडीलांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील ढासळलेल्या परिस्थितीवर मात करीत अंकीताने एमपीएससीचा टप्पा गाठला.अंकिता आपल्या यशाचे श्रेय आई व ज्या वडिलांनी मजुरी करून प्रोत्साहन दिले त्या स्वर्गीय वडीलाना आणि बहीण-भाऊजी यांना दिले आहे. अभ्यास, मेहनत व नियमित सराव केल्यास कुठलीही परीक्षा अवघड नाही. यशाला महागड्या शिकवणीची गरज नाही. यापुढे आणखी वरच्या पदाकरिता आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असल्याचे अंकिताने म्हटले आहे.