Published On : Fri, May 4th, 2018

अण्णाभाऊ महामंडळ घोटाळ्याच्या फाईल्स पळवल्या?


मुंबई: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 385 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधी फाईल्स लंपास झाल्याची भिती व्यक्त करण्यात येते आहे. कारण महामंडळाच्या कार्यालयाचं सील तोडून काही फाईल्स पळविण्यात आल्या आहेत. याबाबतची तक्रार दहिसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, या चोरून नेलेल्या फाईल्स मध्ये साठे महामंडळ घोटाळ्याच्या फाईल्स आहेत की नाही हे अजून निश्चित कळू शकलं नाही.

सामाजिक न्याय विभागाच्या दहिसरमधील हनुमान टेकडी भागात ‘कल्याणी केंद्र’ ही 4 मजली इमारत असून त्याठिकाणी हि चोरी झाली आहे.
घोटाळ्याशी संबंधित सर्व फाईल्स आणि रेकॉर्ड याच इमारतीत होते. फाईल्स लंपास करणाऱ्यांमध्ये घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम यांचा भाऊ असल्याची माहिती आहे.

आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे घोटळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत, हे उल्लेखनीय.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहेत.

यात – कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती. उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला,बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं. नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज दिलं; त्यातले 15 लाख लाच म्हणून घेण्यात आले. अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या. लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले. महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले. विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप आहे.

Advertisement