नागपूर : उपेक्षितांच्या चळवळीत आपल्या शाहिरीने प्रबोधन करणारे समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९९वी जयंती आज गुरुवार, दिनांक ०१ ऑगस्ट २०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यास येथे साजरी करण्यात आली.
जल्हाधिकारी आणि नासुप्र सभापती मा. अश्विन मुद्गल यांच्याहस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नामप्राविप्र’चे अप्पर आयुक्त श्री. हेमंत पवार, अधीक्षक अभियंता (मुख्यालय) श्री सुनील गुज्जेलवार, नामप्रविप्रा’च्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री लांडे, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता(प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर, आस्थापना अधिकारी श्री. योगीराज अवदूत आणि जनसंपर्क व सचिव-१ श्रीमती कल्पना गीते तसेच इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.