कन्हान : – विदर्भ टेलर्स असोशियशन द्वारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ वी जयंती संताजी नगर कांद्री-कन्हान थाटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित प्रेम रोडेकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रामुख्याने उपस्थित विदर्भ टेलर्स असोशियशन च्या पदाधिका-यानी व नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित आणि विनम्र अभिवादन करीत अण्णाभाऊ साठे यांची जयं ती थाटात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विदर्भ टेलर्स असोशियशनचे अध्यक्ष प्रभाकर बावने, नगरसेव क मनिष भिवगडे, ग्रा प कांद्री सदस्य सिंधुताई वाघमा रे, धर्मेंद्र गणविर, नरेंद्र खडसे, श्रीकृष्ण उईके, कल्लुजी नायक, पुंडलिक नागपुरे, राजेश बावने, घनश्याम उईके, प्रेमदास उईके, आयुष्य संतापे, किशोर शिंदे, नरेंद्र शिंदे, ममता इंगोले सह पदाधिकारी व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.