नवी दिल्ली : दिल्लीत पाच फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होईल, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. आठ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
दिल्ली विधानसभेला 70 जागांसाठी ही निवडणूक होणार असून, एकूण 1.55 कोटी मतदार आहेत. 2.8 लाख मतदार हे युवक म्हणजे पहिल्यांदा मतदान करणारे आहेत. दिल्लीत एकूण 13 हजार 033 मतदार केंद्र आहेत. दिल्ली विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल.
ईव्हीएम संदर्भातील आरोपांवर बोलतांना राजीव कुमार म्हणाले की, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असे कोर्टानेही म्हटले आहे. त्यामुळे वायरस किंवा इतर यंत्रणांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतो हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे सांगत राजीव कुमार यांनी राज्यातील निवडणुकांवरील आरोपांवर उत्तर दिले आहे.
दरम्यान दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे,यावेळी दिल्लीमध्ये भाजप विरूद्ध आप असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.