नागपूर : शहरातील एकानामांकित हिंदी वृत्तपत्राचा खंडणीखोर संपादक सुनील सुकलाल हजारी (44) (रा. राहुल रेसिडेन्सी, एसटी बस स्टँडजवळ, पाचवा माळा, गणेशपेठ) यांनी आणखी एका आरटीओ दलालाकडून 3 लाखांची खंडणी उकळली. तसेच त्या दलालाकडून आणखी 1 लाख रुपये उकळण्यासाठी त्याच्यावर हजारी यांनी दबाव टाकल्याची माहिती आहे. त्यामुळे पीडित दलालाने थेट पोलिस आयुक्तांकडे आरोपी हजारीविरुद्ध लेखी तक्रार दिली.बलराज साहनी असे तक्रारदार आरटीओ दलालाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुनील हजारीने आरटीओमध्ये दलाल असलेल्या बलराज साहनी यांच्याविरुद्ध जुलै महिन्यांत बदनामीकारक बातमी प्रकाशित केली. त्यामुळे बलराज यांनी हजारी यांना बदनामी न करण्याची विनंती केली. मात्र, हजारीने त्यांना सुद्धा १० लाख रुपयांची खंडणी मागितली. शेवटी पाच लाख रुपयात सैदा मंजूर झाला.
टोळीतील खंडणीखोर साथीदार कोण?
खंडणीखोर सुनील हजारी हा गेल्या काही दिवसांपासून शहरात काही खंडणीखोर पत्रकारांची टोळी तयार करून खंडणी वसुलीचे काम करीत होते, असे बोलले जाते. त्यामुळे या खंडणीच्या प्रकरणात हजारीच्या टोळीतील खंडणीखोर साथीदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी सदर प्रकरण गांर्भीयाने घेतल्याचे बोलले जाते. सहानी प्रकरणाच्या तपासात अनेकांचे बुरखे फाटणार असल्याचे म्हटले जात आहे.
रुपयांसाठी त्याने धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या साहनी यांनी ३१ जुलैला त्याच्या वृत्तपत्र कार्यालयासमोर ३ लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर हजारी हा एक लाख रुपयांसाठी साहनी यांना फोन करून धमक्या देत होता. सततच्या आर्थिक व मानसिक छळामुळे ते त्रस्त झाले होते. खंडणीसाठी हजारी त्याला फोनवरून धमक्या देत होते. टुटेचा यांच्याकडे पैसे देऊ नको, वृत्तपत्र कार्यालयासमोर थेट माझ्याकडे पैसे दे’ असा संवाद असलेली ध्वनिफीत प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या पाच दिवसांपूर्वी सुनील हजारीने आरटीओ दलाल टिटू शर्मा यांच्याविरुद्ध बातमी प्रकाशित न करण्यासाठी १० लाखांची खंडणी मागितली होती. मात्र, टिटू शर्मा यांनी हजारी याला बदनामीच्या भीतीपोटी १ लाख ८० हजार रुपये दिले होते. उर्वरित रक्कम देण्यापूर्वी त्याने पोलिसात तक्रार केल्यामुळे सुनील हजारीला अटक करण्यात आली. सध्या हजारी मध्यवर्ती कारागृहात आहे.