Published On : Thu, Dec 23rd, 2021
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या कुठल्याही कार्यक्रमाला क्रीडा समितीची परवानगी आवश्यक

Advertisement

क्रीडा विशेष समितीच्या बैठकीत ठराव पारित

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने होणाऱ्या सर्व क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांना क्रीडा विशेष समितीची परवानगी आवश्यक आहे, असा ठराव बुधवारी (ता.२२) क्रीडा विशेष समिती सभापती प्रमोद तभाने यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत पारित करण्यात आला. यावेळी क्रीडा विशेष समिती सभापती प्रमोद तभाने यांच्यासह उपसभापती लखन येरवार, सदस्य प्रमोद कौरती, शेषराव गोतमारे, अमर बागडे, उपायुक्त विजय देशमुख, लिपिक जितेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

क्रीडा विशेष समिती सभापती प्रमोद तभाने म्हणाले, मनपातर्फे होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाची माहिती क्रीडा व सांस्कृतिक समितीला मिळणे आवश्यक आहे. शहरातील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची माहिती समितीला असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाला क्रीडा समितीची परवानगी घेणे गरजेचे असल्याचा ठराव पारित करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

बैठकीत प्रमोद तभाने यांनी समिती अंतर्गत येणाऱ्या कामांचा आढावा घेतला. शहरात सहा विधानसभानिहाय क्रीडा मैदान विकसित करण्याच्या निविदा प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. तसेच मनपाचे क्रीडा धोरण लवकरात लवकर लागू करण्याची सूचना सुद्धा केली. यासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल आणि गांधीनगर स्केटिंग मैदानाच्या निविदा प्रक्रिया जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी प्रमोद तभाने यांनी दिल्या.

मनपातर्फे सर्व पदाधिकारी/नगरसेवक आणि अधिकारी/कर्मचारी यांच्या गीतगायन संध्या कार्यक्रमाबाबत आढावा घेऊन नवीन वर्षानिमित्त १० जानेवारीपर्यंत तारीख निश्चित करण्याचे निर्देशही यावेळी क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांनी दिले.

Advertisement
Advertisement