नागपूर : लाडकी बहिण योजनेसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या अंतर्गत आता महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
31 ऑगस्ट रोजी नागपुरात आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर करू शकतात. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला.
यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे.
या योजनेनुसार, राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार आहे.