Published On : Mon, Oct 7th, 2019

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध

Advertisement

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ८०० उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

आज छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६० उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३३ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २०८ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २१२ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६९ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २५१ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघात २७६ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८४ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ११२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ३७२ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८२ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २०२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १२० उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २३७ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०८ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४० उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २७ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १८६ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १११ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत.

Today’s Rate
Tuesday 12 Nov. 2024
Gold 24 KT 75,900 /-
Gold 22 KT 70,600 /-
Silver / Kg 90,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement