नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतुन नागपुरात सुरु असलेल्या सहाव्या क्रीडा महोत्सवामध्ये 28 जानेवारीला महोत्सवाचा समारोप आहे. या समारोप कार्यक्रमात 19 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय, स्कुल नॅशनल, फेडरेशन नॅशनल या प्राविण्यप्राप्त खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी शहरातील खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात येत असून पात्र खेळाडूंनी बुधवार 24 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री संदीप जोशी यांनी केले आहे.
क्रीडा भूषण पुरस्कारासाठी खेळाडूंनी खासदार क्रीडा महोत्सव कार्यालय, ग्लोकल स्क्वेअर, सीताबर्डी येथे बुधवार 24 जानेवारी पर्यंत सादर करावे. यासाठी काही अटी शर्ती निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मागील 3 वर्षाची राष्ट्रीय स्थरावरील कामगीरी वर्ष 2020 ते 2024, आंतरराष्ट्रीय, स्कुल नॅशनल, फेडरेशन नॅशनल स्तराचे (प्राविण्य) प्रथम, द्वितीय, तृतीय याचे प्रमाणपत्र देण्यात यावे, खेळाडू हा नागपूर जिल्हयाचाच असावा, 1 जानेवारी 2024 पर्यंत खेळाडू 19 वर्षाचा किंवा त्यापेक्षा कमी वयाचा असावा, इंडियन ऑलिम्पीक, एशियनची मान्यता असलेले खेळंच फक्त विचारात घेण्यात येतील या अटी शर्तींच्या अधीन राहून पुरस्कार्थींची निवड केली जाणार आहे. सर्व अधिकार खासदार क्रीडा मंडळाच्या निवड समितीकडे राहील, असेही समितीद्वारे कळविण्यात आले आहे.