सोलापूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मागील दहा वर्षात मोदी सरकारने जनतेची लूट केली आहे.
इतकेच नाही तर ईडी लावा, पक्ष फोडा आणि भाजप वाढवा ,असा एककलमी कार्यक्रमाचा सपाटा लावला आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमध्ये जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. माढा, साताऱ्यासह बहुसंख्य मतदारसंघांमध्ये जनमत विरोधात चालल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
पंढरपुरात आपल्या पक्षाचे नेते अभिजित पाटील यांच्या ताब्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना जप्त करण्याच्या कारवाईमागे भाजपचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र विठ्ठल कारखान्याचे हजारो सभासद शेतकरी त्याचा वचपा काढून भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही पाटील यांनी दिला.