नागपूर शहर विद्यार्थी काँग्रेस (एन.एस.यु.आय) च्या नागपूर शहर अध्यक्ष पदी विद्यार्थी संघटनेतील आक्रमक नेतृत्व असलेले प्रणय सिंग ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणूकीची रण धुमाळी संपताच काँग्रेस ऍक्शन मोड वर आल्याचं यातून स्पष्ट होत आहे आगामी विधानसभा निवडणुकी च्या अनुषंघाने 18 ते 25 वयोगटातील नवीन मतदारांपर्यंत काँग्रेस च्या योजना व काँग्रेस चे योगदान पोहोचवण्याचा दृष्टिकोन समोर ठेऊन पक्षाने अंतर्गत फेरबदल करत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट आहे.
युवकांच्या शिक्षण व बेरोजगारी संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी 24 तास विद्यार्थ्यांसाठी उभा राहील असे मत प्रणय ठाकुर यांनी मांडले.
आज एन एस यु आय चे प्रदेश अध्यक्ष आमीर शेख यांनी दिलेले नियुक्ती पत्र मा नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते देत प्रणय ठाकूर यांची नियुक्ती केली व शुभेच्छा दिल्या.
तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, नागपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष आ. विकासजी ठाकरे,पदवीधर मतदारसंघ क्षेत्राचे आ. अभिजितजी वंजारी, मा. गिरीशजी पांडव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, एन एस यु आय प्रदेश अध्यक्ष आमीर शेख व काँग्रेस पक्षाच्या सर्व सन्माननीय नेत्यांचे प्रणय ठाकूर यांनी आभार मानले.