Published On : Wed, Jan 17th, 2018

नागपूर विमानतळाशी संबंधित कामांच्या प्रस्तावांसाठी दस्तावेजांना मंजुरी

Advertisement


नागपूर: नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उन्नतीकरण, आधुनिकीकरण, देखभाल ही कामे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आणि संकल्पना, बांधणी, वित्त सहाय्य पुरविणे, चालविणे आणि हस्तांतर करणे (DBFOT) या तत्त्वावर करण्यासाठी आवश्यक दस्तावेजांना आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक विमानतळ (मल्टी-मोडल इंटरनॅशनल कार्गो हब ॲण्ड एअरपोर्ट ॲट नागपूर – Multi-modal International Cargo Hub and Airport at Nagpur) विकसित होत आहे. या प्रकल्पात नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विशेष आर्थिक क्षेत्र व संलग्न सेवा-व्यवसाय असे दोन उपप्रकल्प समाविष्ट आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या केंद्रस्थानी असणारे महत्त्वाचे विमानतळ आहे. सध्या मिहान इंडिया लि. या कंपनीमार्फत हे विमानतळ चालविण्यात येत आहे. मिहान इंडिया या संयुक्त कंपनीमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) यांचा अनुक्रमे 51 व 49 टक्के हिस्सा आहे. या दोन घटकांनी केलेल्या करारनाम्यानुसार या विमानतळाचा विकास खासगी विकासकाकडून करण्याचे मान्य करण्यात आले आहे.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या विमानतळाचे उन्नतीकरण, आधुनिकीकरण, देखभाल ही कामे सार्वजनिक – खासगी भागीदारीतून (PPP) करणे तसेच संकल्पना, बांधणी, वित्त सहाय्य पुरविणे, चालविणे आणि हस्तांतर करणे (DBFOT) या तत्त्वावर करण्याबाबत 23 जुलै 2017 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यास अनुसरुन अर्हतेकरिता विनंती (RFQ-Request For Quotation)प्रक्रियेद्वारे पाच कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या पाच कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी, प्रस्तावाकरिता विनंती (RFQ-Request For Proposal) आणि सवलत करारनामा (Concession Agreement) या दस्तऐवजांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Advertisement
Advertisement