नागपूर:महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली.या योजनेच्या माध्यमातून महिलांना १५०० रुपये महिलांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आदिती तटकरे यांचा फोटो आहे. अर्जावर महायुतीच्या नेत्यांचे फोटो असल्यामुळे विरोधकांनी यावर आक्षेप घेतला. आगामी विधनसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारची ही खेळी असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
अर्जावर महायुतीच्या नेत्यांचे फोटो असल्यामुळे इतर पक्षातील नेत्यांची अडचण होणार आहे. कारण या योजनेसाठी इतर पक्षातील नेतेही शिबिर लावण्याची तयारी करत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आदिती तटकरे यांच्या फोटो मुळे या नेत्यांचा प्रचार होणार असल्याने याला विरोधकांनी विरोध केला आहे.
दरम्यान सरकारने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमागे राजकीय हेतू आहे. यातून कोणालाही मदत करण्याचा शासनाचा हेतू नाही तर फक्त राजकीय हेतू आहे. भाजपने केवळ दहा हजार कोटी या योजनेला दिले आहेत. तसेच येत्या विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या अर्जावर मुख्यमंत्र्यांसह, तिघांचे आणि नरेंद्र मोदींचे फोटो आहेत.मात्र कोणत्या योजनेवर असे फोटो लावता येत नाहीत, असे म्हणत रोहित पवार यांनी सरकारवर हल्लबोल केला.