नागपुर– मौजा सिंजर ता नरखेड येथील 11 शेतकऱ्यांनी पो स्टे जलालखेडा येथे दि 9/8/18 रोजी तक्रार दिली होती की सिंजर गावातील रोजगार सेवक निलेश ढोपरे यास शासनाचे मनरेगा योजने अंतर्गत जॉब कार्ड बनविण्याकरिता आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र व फोटो दिले होते परंतु त्याने सदर कागदपत्रांचा गैरवापर करून श्री जगदंबा वेअर हाऊस चे मालक राकेश सिंग याचे सोबत संगनमत करून ‘कॉर्प अग्रिकल्चर प्रोडूस ऋण’ या शासकीय योजने अंतर्गत कॉर्पोरेशन बँक नागपूर येथून त्यांचे नावाने ऋण घेतले.
सदर अर्जाचे चौकशीत नूतन राकेश सिंग , राकेश उपेंद्र सिंग यांनी निलेश ढोपरे चे मदतीने कॉर्पोरेशन बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची व बँकेची एकूण 5,24,00000 रू ची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींविरुद्ध पो स्टे जलालखेडा येथे अप क्र 304/18 कलम 420, 409, 467, 468, 471 भा द वि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक , आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण हे करीत असून तपासा दरम्यान गुन्ह्यात कलम 120ब, 411, 413 भा द वि तसेच कलम 3 एम पी आय डी अक्ट वाढविण्यात आले. दि. 24/7/20 रोजी सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी नूतन राकेश सिंग, राकेश उपेंद्र सिंग दोन्ही रा बोखारा, कोराडी नागपूर व निलेश शेषराव ढोपरे रा सिंजर त नरखेड यांना अटक करण्यात आली आहे.