Published On : Fri, Apr 8th, 2022
By Nagpur Today Nagpur News

आज नागपुर ते रामटेक पायदळ वारी चे कन्हान-कांद्री ला आगमण

कन्हान : – सर्वश्री वारकरी सांप्रदाय सेवा समिती व्दारे श्री राम नवमी निमित्य श्री संत ञानेश्वर मंदीर जुनी मंगळवारी नागपुर ते श्री क्षेत्र रामटेक पायदळ वारी दिंडी सोहळा चे कन्हान-कांद्री येथे आगमण व मुक्काम होणार आहे.

श्री राम नवमी निमित्य सर्वश्री वारकरी सांप्रदाय सेवा समिती व्दारे गुरूवार (दि.७) एप्रिल ते (दि.११) एप्रिल २०२२ पर्यंत श्री संत ञानेश्वर मंदीर जुनी मंगळवारी नागपुर ते श्री क्षेत्र रामटेक पायदळ वारी दिंडी सोहळाचे आयोजन करून गुरूवार (दि.७) एप्रिल ला सकाळी ७ वाजता श्री संत ञानेश्वर मंदीर जुनी मंगळवारी नागपुर अभिषेक, पुजन करून पायदळ वारी दिंडी सोहळयाची सुरूवात होऊन सायंकाळी ७ वाजता भवानी माता मंदीर पारडी नागपुर येथे भजन, किर्तन, भोजन व मुक्काम राहणार आहे.

Gold Rate
Saturday 22 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज शुक्रवार (दि.८) ला सकाळी ६ वाजता पारडी येथुन प्रस्थान करून भरतवाडा येथे फरा़ळ, सकाळी १० वाजता कामठी रोज मढी दुर्गा मंदीर घोरपड येथे जेवन सायंकाळी ५ वाजता साई मंदीर कामठी-कन्हान येथे चहापाणी घेऊन सायंकाळी ६ वाजता कन्हान नगरीत आगमन होताच स्वागत करून श्री संताजी स्मृती सभागृह कन्हान-कांद्री येथे भजन, किर्तन, भोजन व रात्री मुक्काम करून शनिवार (दि.९) एप्रिल ला सकाळी ६ वाजता कांद्री, बोरडा रोड निमखेडा मार्ग रामटेक करिता प्रस्थान करण्यात येणार आहे.

Advertisement