आज समाजात दिव्यांग व्यक्तीला सुद्धा मानाचे स्थान आहे. दिव्यांग बांधवांनी आपल्या ईच्छाशक्तीच्या जोरावर अनेक क्षेत्रात नाव कमावले आहे. अश्याच उदंड ईच्छाशक्तीचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून नावाजलेल्या पुणे शहरातून दिव्यांग क्रिकेट टीम नागपूर शहरात एका स्पर्धेकरिता आली असल्याने त्यांचा राहण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. पण अश्या वेळेस पुण्याच्या दिव्यांग बांधवांनी प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहर चे राजेश बोढारे व शबिना शेख यांचेशी संपर्क केला. त्याचवेळी नागपूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या अपंग सेलच्या मदतीने व नागपूर शहरातील समाजकार्यातील अग्रेसर संस्था हजरत बाबा ताजुद्दीन औलिया बहुद्देशीय सेवा संस्था यांचे मदतीने पुणे येथील दिव्यांग खेळाडूंच्या राहण्याचा प्रश्न निकाली निघाला.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहर कार्याध्यक्ष शबिना शेख यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्ती आपल्या जिद्दीच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीला समोर जाऊ शकतो. व पुणे येथील दिव्यांग खेळाडू याचेच मूर्तिमंत उदाहरण होय. प्रहार चे संस्थापक व राज्याचे राज्यमंत्री आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचे निर्देशानुसार प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर असते. त्याच धर्तीवर दिव्यांग खेळाडूंची ही व्यवस्था करणे म्हणजे पुण्याचा एक भाग असल्याचे शबिना शेख यांनी सांगितले. प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहर अध्यक्ष राजेश बोढारे यांनी हजरत बाबा ताजुद्दीन संस्थेचे आभार मानले.
यावेळी प्रमुख रूपाने हजरत ताजुद्दीन औलिया बहुद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष साजिद भाई, प्रहार अपंग सेलचे धरम, उमेश गणवीर
ज्योती बोरकर, उमेश राऊत, सचिन पांडे, सचिन तारारे व मोठ्या प्रमाणात प्रहार चे कार्यकर्ते उपस्थित होते.