Advertisement
नागपूर : शहरातील सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथींना बेकायदेशिरीत्या एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी हे कलम (Section 144 imposed in Nagpur) लावण्यात आले आहे. नागपूर शहरात काही दिवसांपूर्वी खंडणीच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
शहरांतील तृतीयपंथी सार्वजनिक ठिकाणे, ट्रॅफिक सिग्नल्स, लोकांची घरे, लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांना निमंत्रित न करता भेट देतात, अश्लील कृत्य करतात आणि नागरिकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळतात. याबाबत वारंवार अशा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे अमितेश कुमार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.