Published On : Tue, Sep 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत…नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन प्रकरणावरून संजय राऊत संतापले

Advertisement

नागपूर : नागपूर शहरात रविवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत ऑडी कार चालकाने एका दुचाकीसह पाच चारचाकी वाहनांना धडक दिली. या हिट अँड रन केसमधील कार ही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याची आहे. यावरून विरोधकांनाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीससह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली.

पोलीस यंत्रणा देवेंद्र फडणवीसांच्या कोठ्यावर नाचत आहे. नाचवले जात आहे. विकत घेतले जात आहे. एफआयआरमध्ये संकेत बावनकुळेचे नाव देखील नाही.चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा विषय नाही आहे.

Advertisement
Today's Rate
Wed 11 Dec. 2024
Gold 24 KT 78,100/-
Gold 22 KT 72,600/-
Silver / Kg 94,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या राज्यातल्या कायदा असं व्यवस्थेचा जो कचरा झालेला आहे कायदा दोन आहेत का? एका बाजूला नरेंद्र मोदी सामान कायद्याच्या गोष्टी करतात. कायदा सर्वांसाठी सारखा आहे, म्हणतात पण या राज्यात तसे नाही आहे, असे राऊत म्हणालो.शहजादे नशेमध्ये होते. त्यांना वाचवत आहेत. कोणत्या दुसऱ्या पार्टीचा नेत्याचा मुलगा असला तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या फौजेने आमच्यावरती किती तरी हल्ले केले असते.

देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्रिपदावरती बसण्याचे लायक नाहीत. जोपर्यंत फडणवीस त्या पदावरती आहेत त्या आरोपीचे चौकशी होणार नाही, असेही राऊत म्हणाले.

Advertisement