Published On : Fri, Sep 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अब तक 56 … गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाची संख्या 65 च्या पुढे जाण्याची शक्यता !

Advertisement

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत असलेल्या नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीने डोकेवर केले आहे. दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीच्या प्रमाणामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागपुरात 2023 च्या पहिल्या 8 महिन्यांत तब्बल 56 खुनांची नोंद झाली. तर 2022 मध्ये शहरात एकूण 65 खूनांची नोंद झाली. सध्या महिन्याला सात खूनांचा जणू ट्रेंडच सुरु आहे. या घटना जर अशाच सुरु राहिल्या तर शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत खुनाचा आकडा 65 च्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

2022 च्या पहिल्या आठ महिन्यांत नागपूर शहरात 49 खून झाले, 2023 मध्ये हीच संख्या वाढून 57 वर पोहोचली. 2023 हे वर्ष हत्यांच्या घटनांसाठी दुर्दैवी ठरले. नागपूर शहरातील पाचपौली परिसरात झालेल्या खुनाने नवीन वर्षाची म्हणजेच 2023 ची सुरुवात झाली होती. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शहरात खुणांच्या घटनांनी नागपूर हादरले. धक्कादायक म्हणजे ऑगस्ट महिन्यात ही संख्या जवळपास दुप्पट झाली.ऑगस्ट, 2023 पर्यंत, नागपूर शहरात गेल्या वर्षीच्या याच वेळेच्या तुलनेत 7 अधिक खून झाले आहेत. तथापि, सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यानंतर, शहरात गुन्हेगारीचा घटनांमध्ये घट होते.

Gold Rate
19 April 2025
Gold 24 KT 95,800 /-
Gold 22 KT 89,100 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘नागपूर टुडे’शी बोलताना, पोलिस उपायुक्त (डीसीपी) गुन्हे शाखेचे मुम्माका सुदर्शन यांनी सांगितले की, 2022 च्या तुलनेत या वर्षी ऑगस्टपर्यंत शहरात सर्वाधिक खून झाले आहेत. तथापि, डीसीपी म्हणाले की यातील बहुतांश घटना कौटुंबिक कलहामुळे घडल्या.

शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिस सर्व प्रतिबंधात्मक पाऊले उचलत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक डीसीपी रात्री 1 वाजेपर्यंत रस्त्यावर गस्त घालत आहेत. आम्ही 40 हून अधिक MPDA आणि 10 MCOCA आरोपींवर लावण्यात आले. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे गुन्हे दाखल केले जातात.परंतु या धोक्याला आळा घालण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या वर्षातील खुनाचा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ च्या पुढे जाणार नाही, याची आम्हाला खात्री असल्याचे डीसीपी मुम्माका सुदर्शन यांनी सांगितले.

– शुभम नागदेवे

Advertisement
Advertisement