नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत जागावाटपावर चर्चा यशस्वी न झाल्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
तसेच त्यांनी काही मतदारसंघांतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची नावेही जाहीर केली होती. दरम्यान, स्वबळावर लढत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाठींबा जाहीर केला आहे. ओवैसी यांनी अकोला मतदासंघात आंबेडकर यांना पाठींबा जाहीर केला.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित यांच्यात आघाडी झाली होती. मात्र ही आघाडी काही महिन्यांतच तुटली होती.दलित नेत्यांना नेतृत्व मिळाले पाहिजे.मी अकोल्यामधील एमआयएमच्या मतदारांना प्रकाश आंबेडकर यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे.
दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. तसेच अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांना धक्का देऊ शकतात,अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.